Breaking news

पुणे जिल्ह्याचा पारा अब की बार @ 43 पार

लोणावळा : मागील काही दिवसापासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्मा वाढली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आज तापमान 43 अंशाच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळाले. पर्यटन नगरी व थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरांमध्ये आज 36.8 अंश तापमान होते. मागील दोन दिवसांमध्ये लोणावळा शहरातील तापमानात मोठी वाढ झाली असून सरासरी 38 ते 40 अंशा पर्यंत लोणावळा शहराचे तापमान गेल्याने पुणे जिल्ह्याप्रमाणेच लोणावळा शहरात देखील उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा व रात्री देखील वातावरणात उष्मा जाणवू लागली आहे. मुंबई व परिसरामध्ये पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आली आहेत. उष्णतेमुळे मागील दोन दिवस पुणे जिल्ह्यात काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी देखील बरसल्या आहेत.

     आज पुणे जिल्ह्यामधील सर्वाधिक तापमान हडपसर येथे 43.5 अंश नोंदवण्यात आले. तर लोणावळा शहरामध्ये सर्वात कमी 36.8 अंश तापमान नोंदवण्यात आले आहे. वाढत्या नागरीकरणामुळे राज्यात सर्वत्र वातावरणात मोठा बदल झाला असून तापमानात वाढ होऊ लागली आहे. यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने ऊष्मा वाढली आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी. महत्वाची कामे सकाळी व संध्याकाळी करावी, दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.



इतर बातम्या