Breaking news

Accident News : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक पलटी; सुदैवाने जिवितहानी टळली

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा एक मालवाहू ट्रक क्र. (KA 56 - 6150) हा किमी 37 जवळ ब्रेक फेल झाल्याने उतारावर पटली झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसली तर मुंबईच्या दिशेने जाणार्‍या मार्गिकेवर वाहतूककोंडी झाली होती. या अपघातात क्लीनर मुजफ्फर शेख यास किरकोळ मार लागला आहे. अपघाताची माहिती समजताच आय आर बी पेट्रोलिंग, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, मृत्युंजय देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य हॉस्पिटलची अँब्युलन्सनी तत्काळ मदतकार्य करत ट्रक बाजुला करत वाहतूक सुरुळीत केली.

पुण्याकडे येणार्‍या मार्गिकेवर वाहतूककोंडी 

सुट्टयांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनांमधून फिरायला घराबाहेर पडत असल्याने आज सलग तिसरा आठवडा खंडाळा घाटात वाहतूककोंडी झाली आहे. आज देखील सकाळपासून वाहतूककोंडी झाली आहे. कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांना थांबवून धरण्यात आले असून लहान प्रवासी वाहने पुढे सोडली जात आहे. खंडाळा बोगदा येथे मुंबईकडे जाणार्‍या मार्गिकेवर लहान लहान ब्लाॅक घेत पुण्याकडे जाणार्‍या वाहनांसाठी सर्व लेन खुल्या केल्या जात आहेत. ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

इतर बातम्या