Breaking news

Traffic diversion l पावसाळी गर्दी टाळण्यासाठी लोणावळा परिसरात वाहतूक मार्गात बदल; 7 जून ते 31 ऑगस्टदरम्यान पर्यटकांसाठी नवे नियम लागू

लोणावळा : पावसाळा सुरु होताच लोणावळा आणि परिसरातील एकविरा देवी, भाजे लेणी, लोहगड, विसापूर, टायगर पॉईंट, पवना डॅम यांसारख्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी व अपघातांची शक्यता लक्षात घेता पुणे ग्रामीण पोलीस व जिल्हा प्रशासनाने वाहतूक मार्गात महत्त्वपूर्ण बदल करत पर्यायी मार्गांची घोषणा केली आहे. हे बदल दि. 7 जून 2025 ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान लागू असणार आहेत.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करत ही अधिसूचना जारी केली असून, यामध्ये पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:

1} भाजे गावाकडून मळवली- कार्ला मार्ग बंद

➤ पर्यायी मार्ग : पाटण ब्रिज– देवले– औंढे ब्रिज– कुसगाव– लोणावळा– जुना हायवे/एक्सप्रेस वे.

2} औंढे - देवले रोडने मळवली- भाजे येथे येणारी वाहतूक बंद

➤ पर्यायी मार्ग : औंढे– लोणावळा– कार्ला फाटा– मळवली– भाजे.

3} मळवली व सदापूरहून कार्ला बाजूकडे जाणारी वाहतूक बंद

➤ पर्यायी मार्ग : मळवली– सदापुर– वाकसई फाटा– जुना हायवे.

4} वाकसई फाटा ते मळवली मार्ग बंद

➤ पर्यायी मार्ग : कार्ला फाटा– मळवली– पाटण– भाजे.

5} भाजे ते लोहगड मार्ग 'वन वे' करण्यात आला आहे

➤ फक्त भाजे येथून लोहगडाकडे जाणारी वाहने परवानगी.

6} लोहगडहून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग सुचवले :

➤ चारचाकी : लोहगड– दुधिवरे खिंड– औंढोली– औंढे– कुसगाव– लोणावळा

➤ दुचाकी/तीनचाकी : वरील मार्ग किंवा पवनानगरमार्गे हायवेचा वापर करावा.

7} कार्ला फाटा ते वेहेरगाव या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी.

8} महत्वाची सूचना – वरील सर्व निर्बंध स्थानिक रहिवाशांसाठी लागू राहणार नाहीत.

.    जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने हा आदेश 6 जून 2025 रोजी जारी करण्यात आला आहे. पर्यटकांनी प्रशासनाने ठरवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस व प्रशासनाने केले आहे.

इतर बातम्या