Breaking news

Accident News l मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा येथे भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू तर 14 जण जखमी

लोणावळा : मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा बॅटरी हिल या ठिकाणी एका भरधाव वेगातील ट्रकचालकाने समोर जाणाऱ्या एका कारला मागून जोरात धडक दिली. सदर कार ही समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 14 जण किरकोळ जखमी झाले आहेत. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सागर पांडुरंग इंगुळकर (राहणार पुणे) यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची फिर्याद दिली आहे.

      लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक नंबर GJ 63 BT6701 हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाने भरधाव वेगात समोर जाणारी इनोव्हा कार नंबर MH 19 BG 8067 हीला मागून जोरात धडक दिली, त्या धडकेमुळे सदरची इनोव्हा गाडी समोरून येणारी एर्टिगा कार नंबर MH 12 UC 2800 हिला जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये प्रिया सागर इंगुळकर (राहणार शुक्रवार पेठ, टिळक रोड, पुणे), निलेष संजय लगड (वय 42 वर्षे), श्राव्या निलेश लगड (वय 12 वर्षे दोन्ही रा. सदशिवपेठ, पुणे) यांचा गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर एर्टिगा कारमधील शस्यु, रूद्राक्ष, अषिका मोगल, आरव मोगल, अर्ष लगड, आरसित लगड यांना हाता पायाला व खांदयाला किरकोळ दुखापत झाल्या असून मुक्का मार लागलेला आहे. तर इनोव्हा कार मधील प्रवासी अष्वीनी रमेष जाडकर (वय 43 वर्षे), ओमकेश रमेश जाडकर (वय 22 वर्षे), सुमित तुकाराम कदम (वय 24 वर्षे), पुष्कार लक्ष्मण शेळकंदे (वय 25 वर्षे), जिगनेश रमेश जाडकर (वय 12 वर्षे), संजय नामदेव वाल्हेकर (वय 42 वर्षे), विमल नामदेव वाल्हेकर (वय 69 वर्षे सर्व रा. भिंवडी जि. ठाणे) हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. 

    याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड पुढील तपास करत आहेत.


इतर बातम्या