Breaking news

प्रसिद्ध अभिनेते आरमान कोहली यांच्या लोणावळ्यातील बंगल्यात चोरी; बारा तोळ्याची चैन व एक लाख रुपये लंपास

लोणावळा : प्रसिद्ध सिने अभिनेते आरमान कोहली यांच्या लोणावळा गोल्ड व्हॅली येथील कोहली इस्टेट या बंगल्यामधील लॉकर मधून एक लाख रुपये रोख व बारा तोळे वजन असलेली सोन्याची चैन चोरी झाली आहे. 25 मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे.

      या प्रकरणी आज 26 मार्च रोजी अरमान राजकुमार कोहली (वय 53) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये चोरीची फिर्यादी दिली आहे. 

   लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरमान कोहली हे त्यांच्या लोणावळ्यातील बंगल्यामध्ये असताना त्यांनी बेडरूमच्या शेजारी असलेल्या साईड टेबलवरील लॉकरमध्ये एक लाख रुपये कॅश व बारा तोळे वजन असलेली सोन्याची चैन ठेवली होती. मंगळवारी 25 मार्च रोजी त्यांनी लॉकरमध्ये बघितले असता त्यांना आत मध्ये रोख रक्कम व चैन दिसून आली नाही. 

        अरमान कोहली यांनी त्यांच्या घरात काम करणारे, आकाश गौड (वय 21, राहणार जौनपुर, उत्तर प्रदेश) व संदीप गौड (वय 23 राहणार खुतान, जौनपुर उत्तर प्रदेश) ह्या दोघांनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी सदरची चैन व रोकड चोरून नेहली असल्याची फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यावरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केरुरकर हे करत आहेत.

इतर बातम्या