Breaking news

निवडून येण्याची क्षमता असणार्‍यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश - अजित पवार

पिंपरी चिंचवड : महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असणार्‍यांसाठी पक्षाची दारे उघडी आहेत. ताकदीची मॅजिक फिगर गाठण्यासाठी इलेक्टीव्ही मेरीट पाहणार आहे. काही कारणांमुळे जे पक्ष सोडून गेले. ते परत येत असतील व ते आपल्याकडील कार्यकर्त्यांपेक्षा जास्त ताकदीचे असतील तर त्यांना सामावून घेतले जाणार आहे, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना दिले.

    आकुर्डीतील डॉ. डी वाय पाटील महाविद्यालय संकुलात कार्यक्रमासाठी आले असताना पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमींगसाठी पक्षांचे दरवाजे उघडे आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला असता ज्यांचे इलेक्टीव्ह मेरीट आहे. आमच्याकडे असणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यापेक्षा ताकदीचा नगरसेवक येणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे. कोणत्याही निवडणूकीत मॅजीक फिगर महत्वाची असते. राज्यात २८८ पैकी ज्यांच्याकडे १४५ आमदार आहेत. तेच राज्यात सरकार स्थापन करू शकतात. तसेच महानगरपालिकेत पण आहे. पक्षाचे आता आहेत त्यापेक्षा अधिक नगरसेवक निवडूण आले पाहिजेत. सर्वांना माहिती आहे, की भाजपातील आताचे कितीतरी नगरसेवक असे आहेत की ज्यांना पाठीमागच्या कालखंडात मी त्यांना संधी दिली. त्यांना वेगवेगळी पदे दिली. 

    अजितदादा म्हणाले, भाजपाने सत्तेचा वापर केला व देशात मोदी लाट असल्याने काहीजण तिकडे गेले पण ते आता पुन्हा माझ्या संपर्कात आहेत. सध्या जे पक्षात येत आहेत ते अपक्ष आहेत अथवा पदाधिकार्‍यांचे नातेवाईक आहेत. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्यांचे त्यांच्या पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत नगरसवेक पद रद्द होऊ शकते. ते अपात्र झाले तर सहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही. त्यामुळे महिला नगरसेविकाचा पती, नगरसेवकांचे नातेवाईक यांची सध्या इनकमिंग सुरू असल्याचे सांगितले.

इतर बातम्या