Breaking news

Maval Political News | त्यांच्यात अहंकार ठासून भरलाय; 13 तारखेला मतदार राजा काय ते दाखवून देईल - संजोग वाघेरे

मावळ माझा न्युज : समोरचा उमेदवार कोण आहे मी ओळखत नाही या विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विधानाचा समाचार घेताना महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे म्हणाले, मी मागील अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड च्या राजकारणात सक्रिय आहे व मावळ लोकसभेचा एक मतदार आहे. मागील दोन वेळा लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या खासदाराला आपला मतदार माहीत नाही यावरून त्यांच्या बुध्दीची कीव येते तसेच त्यांच्या या विधानावरून त्यांच्यात अहंकर किती ठासून भरलाय हे दिसतंय. येत्या 13 तारखेला मतदार राजा काय ते दाखवून देईल, महा विकास आघाडीचा उमेदवार किमान पावणे चार लाख मतांनी विजयी होईल असा विश्वास देखील त्यांनी आकुर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.

    संजोग वाघेरे म्हणाले, मागील दहा वर्षात एकही नवीन प्रकल्प मतदार संघात आला नाही. मतदार संघात विकासाची कामे न झाल्याने सर्वसामान्य मतदार नाराज आहे तसेच नेते देखील नाराज आहेत. मावळ लोकसभा मतदार संघ हा वाड्या वस्त्यांचा व ग्रामीण भागाचा सर्वाधिक भाग असलेला मतदार संघ आहे. मागील दहा वर्षात त्यांचे प्रश्न सुटलेले नाही. केवळ लोकसभेत बोलणारा नाही तर मतदार संघात नागरिकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेऊन तो सोडविणारा खासदार हवा आहे. आम्ही काय केलं हे पिंपरी चिंचवड जनतेला माहीत आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे हाच आमचा प्राधान्यक्रम असणार आहे. आणि तेच प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत.

      विकास कामांवर न बोलता केवळ लाटेवर स्वार व्हायचे हेच मागील दहा वर्षात झाले आहे. त्यामुळे मतदार संघात कामे तशीच राहिली आहेत. काल त्यांच्याच मेळाव्यात मावळ विधानसभा क्षेत्रात मागील दहा वर्षापासून रखडलेल्या कामांचा पाडा वाचून दाखवण्यात आला. त्यावरून खासदार किती कार्यक्षम आहे हे जनतेने पाहिले आहे.    

      विजय कोणाचा होणार हे सर्वसामान्य मतदार ठरवत असतो व मावळ लोकसभा मतदार संघातील मतदार यांच्या दहा वर्षाच्या कारभाराला कंटाळला आहे. तेच काय ते येत्या 13 तारखेला दाखवून देतील. मतदार संघात प्रचारासाठी फिरताना नागरिक ज्या पद्धतीने समस्यांचा पाडा वाचून दाखवत आहेत, त्यावरून त्यांनी काय विकास केला हे दिसून येत आहे. आम्ही कोणावर टीका करत नाही तर जी वस्तुस्थिती आहे ती दाखवून देत आहे. दहा वर्षात मोठा औद्योगिक पट्टा असलेल्या मावळ लोकसभा मतदार संघातील कामगारांचे प्रश्न सुटलेले नाही, कंपन्या बाहेर जात आहेत, तरुणांच्या हाताला रोजगार नाही, पर्यटनाला चालना दिलेली नाही, वाहतूक कोंडीचे प्रश्न गंभीर झाले आहेत, पवना व इंद्रायणी नदीचे प्रश्न आजही तसेच आहेत, राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलांची कामे झालेली नाहीत, केंद्र शासनाशी संबधित अनेक प्रश्न बाकी आहेत, रेल्वेचे प्रश्न तसेच आहेत, लोकल चा प्रश्न सुटलेला नाही असे कितीतरी प्रश्न प्रलंबित असल्याने मतदार संघातील नागरिक नाराज आहेत. विकास कामे केलीच नाहीत तर आता किती उर बडवला तरी नाराज असलेल्या नागरिकांच्या मनात स्थान निर्माण होणार नाही. येत्या 13 तारखेला काय ते मतदार दाखवून देतील असे संजोग वाघेरे म्हणाले.

इतर बातम्या