निसर्गोपचार कोर्स करण्यासाठी सुवर्णसंधी l कैवल्यधाम योग संस्थेत जूनपासून निसर्गोपचार प्रशिक्षण कोर्स सुरू होणार

लोणावळा: जगप्रसिद्ध कैवल्यधाम योग संस्था (Kaivalyadhama) येथे येत्या (जून 2025) महिन्यापासून निसर्गोपचार परिचारिका कोर्स सुरू होणार आहे. सहा महिन्यांच्या (100 तास) प्रशिक्षणानंतर सहा महिन्यांची इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध होणार असून, एक वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
कोर्सची वैशिष्ट्ये:
- संपूर्ण निसर्गोपचार थेरपीचे सखोल प्रशिक्षण
- निसर्गोपचार तत्त्वे, उपचार पद्धती, आहार व जीवनशैलीवर आधारित समग्र आरोग्य थेरपीचे शिक्षण
- सहा महिन्यांचे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ट्रेनिंग
प्रवेशासंबंधी माहिती:
- स्थानिक नागरिकांना प्राधान्य
- प्रशिक्षणार्थीचे शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या फिट असणे आवश्यक
- मर्यादित जागा, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा
नोंदणी व अधिक माहिती:
कैवल्यधाम योग संस्थेच्या वतीने लोणावळा व मावळ परिसरातील तसेच इतर भागातील नागरिकांना प्रवेशासाठी लवकर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी www.kdham.com या वेबसाइटला भेट द्या किंवा कार्यालयीन वेळेत खालील क्रमांकावर संपर्क साधा : + 91 7262026878 / 02114 - 273001
[निसर्गोपचारात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याने इच्छुकांनी त्वरित नोंदणी करावी!]