Breaking news

खोपोली येथील कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

खोपोली (प्रतिनिधी) : कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास आणि खालापूर तालुका कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन खोपोली येथील लायन्स क्लबच्या भव्य हॉल मध्ये संपन्न झाले. स्पर्धेचे उदघाटन अर्जुन पुरस्कार विजेते आंतराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक काकासाहेब पवार यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ सुनील पाटील अध्यक्ष खालापूर तालुका कुस्तीगीर यांनी भूषविले. यावेळी संजय शिर्के, प्रमोद महाडिक, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभूते, अंकित साखरे, अमोल जाधव, संदीप वांजळे, मारुती आडकर, सुभाष घासे, दत्तात्रय पालांडे, गुरुनाथ साठेलकर, जितेंद्र सकपाळ, सचिन मोरे, तानाजी चव्हाण, दिलीप देशमुख, भरत शिंदे, दिलीप कचरे, दिनेश मरागजे, संदीप पाटील, विजय चव्हाण अनिल सावंत, जयेश पाटील आदी उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष राजाराम कुंभार यांनी केले तर सूत्रसंचालन रायगड भूषण जगदिश मरागजे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती शिंदे, अपर्णा पाटील, रोशनी परदेशी, नेहा पाटील, सानिका सूर्यवंशी, सोहेल शेख यांनी मेहनत घेतली. या स्पर्धेचे पंच म्हणून राज्य पंच सुनील नांदे, सावळाराम पायमोडे, रुपेश पावसे, समीर शिंदे यांनी काम पाहिले

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे : 14 वर्ष मुली - 30 किलो गट - आस्था मरागजे (प्रथम), रुतुजा मरागजे (द्वितीय). 35 किलो - हांसिका कुंभार (प्रथम), निर्जरा पाटील (द्वितीय). 40 किलो - क्षितीजा मरागजे (प्रथम), जान्हवी सकपाळ (द्वितीय). 45 किलो - राजनंदिनी दुंदले (प्रथम), प्रणिती शिंदे (द्वितीय). 50 किलो - सानिका सत्रे (प्रथम), श्रावणी जाधव (द्वितीय)

14 वर्ष मुले : 25 किलो - प्रथमेश म्हात्रे (प्रथम), श्रेयस शिंदे (द्वितीय). 30 किलो - वेद मरागजे (प्रथम), भूमीत म्हात्रे (द्वितीय). 35 किलो - आदर्श नाळे (प्रथम), सिद्धार्थ भोपी (द्वितीय). 40  किलो - शिवम म्हात्रे (प्रथम), ओम म्हात्रे (द्वितीय). 45 किलो - वेदांत पाटील (प्रथम), सुशांत सरक (द्वितीय)

17 वर्ष मुली - 40 किलो - सई शिर्के. 45 किलो - आरती शिंदे, प्रियांका मेश्राम. 50 किलो - फरा कर्वेकर. 55 किलो - वैष्णवी कुंभार. 60  किलो - वैष्णवी गंगावणे, श्वेता शर्मा

17 वर्ष मुले : 45 किलो - भूषण पवार, प्रतीक घाटावकर. 50 किलो - नयन पाटील, आयुष् पाटील. 55 किलो - अवधूत खोत, दिशांत सोनार. 60 किलो - यश मढवी. 65 किलो- गणेश खाडे

वरीष्ठ गट महिला - 53 किलो - पायल मरागजे, सानिका झांजे. 57 किलो - देवयानी बडगुजर. 60 किलो - सेजल पाटील. 65 किलो - अमेघा घरत, भाविका खरमाळे. 70 किलो - सानिका राऊत.

वरीष्ठ गट पुरुष - 50 किलो - विशाल भगत, विवेक धुळे. 55 किलो - चिराग गायकवाड, वरून पाटील. 60 किलो - राज पाटील, विजय धुळे. 65 किलो - रोहिदास पाटील, पंकज जोशी. 70 किलो - किरण ढवळे, रोहित काळे. 75 किलो - दिवेश पालांडे, रोशन धुळे. 76 किलो वरील - ओमकार निंबळे, करण बामगुडे

इतर बातम्या