Breaking news

Breaking News l कामशेत जवळ भीषण अपघात; कंटेनर ची तीन वाहनांची धडक

मावळ माझा न्युज नेटवर्क : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कामशेत घाटामध्ये एक डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. पुण्याकडून मुंबईकडे जाणारा एक कंटेनर ट्रक (MH-43-TL-9710) हा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अचानक डिव्हायडर ओलांडून मुंबईच्या बाजूकडील मार्गावर आला. त्यामुळे एक मोठा लोखंडी पाईप रस्त्यावर पडला आणि एकूण चार वाहने या अपघातात अडकली.

    या अपघातात (MH-43-BB-7873) या चारचाकी गाडीतून प्रवास करणारे अनिकेत संतोष शिंदे (वय 21, रा. नेरूळ, मुंबई) व यज्ञेश मधुकर गोलंबे (वय 19, रा. नेरूळ, मुंबई) यांना दुखापत झाली आहे. तसेच Eco गाडी (MH-14-SH-3265) या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुचाकी गाडी (MH-12-KN-7949) वरील अनिकेत संतोष शिंदे आणि अंगथाई फ्रू मोग (वय 25, रा. त्रिपुरा) यांना गंभीर दुखापत झाली आहे. पायी जाणारे अनुसया प्रभाकर खांडेकर (वय 50, रा. कुसगाव, मावळ) व चिंगुबाई लहु सुराणा (वय 30, रा. कामशेत) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

     अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना त्वरित नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक तपासात कंटेनर ट्रक चालक अशोक रामचंद्र गवित (रा. कोरडा, ता. नवापूर, जि. नंदुरबार) याच्या निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे अपघात झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत. 



इतर बातम्या