Breaking news

आता होणार भिर्रर्र… बैलगाडा शर्यतीला मान्यता; कायद्यातील सुधारणेला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

मावळ माझा न्युज : बैलगाडा शर्यत, जलिकटू आणि कंबाला या खेळांना मान्यता देण्यासाठी अनुक्रमे महाराष्ट्र, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांनी कायद्यात केलेल्या सुधारणा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्या. त्यामुळे आता राज्यात सर्वत्र सर्जा राजाच्या जोड्या कायदेशीर अडथळ्यावीना सुसाथर वेगाने धावणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील बैलगाडा शौकिनांनी आनंद व्यक्त केला आहे. मावळात देखील एकमेकाला पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. बैलगाडा शर्यत हा ग्रामीण भागातील महत्वाचा खेळ आहे. प्रत्येक गावाच्या उत्सवात बैलगाडा पळविण्याची परंपरा आहे. सोबतच विविध कार्यक्रमांच्या व सण उत्सवाच्या निमित्त, वाढदिवसाच्या निमित्त बैलगाडा शर्यती भरविल्या जातात. ग्रामीण भागाचे मोठ्या प्रमाणात अर्थकारण या बैलगाडा शर्यतीवर अवलंबून आहे. 

    2011 साली बैल या प्राण्यांचा संरक्षित प्राण्यांच्या यादीत समावेश करण्यात आल्याने बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून बैलगाडा संघटना याविरोधात लढा देत होती. प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम 1960 च्या तरतूदींचे उल्लंघन होत असल्याचे मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने या खेळांवर बंदी घातली होती. त्यानंतर वरील तिन्ही राज्यांनी सुधारित कायदे करत अटी व शर्तीवर खेळाला परवानगी देण्याची विनंती करण्यात आली होती. 2021 साली ही बैलगाडा शर्यतींना सशर्त मान्यता देण्यात आली होता. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाने कायद्यात केलेल्या सुधारणा मान्य केल्याने आता बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. 

इतर बातम्या