Breaking news

एकविरा देवीच्या दर्शनाला भाविकांची तुफान गर्दी; कार्ला फाट्यापर्यत वाहनांच्या रांगा

लोणावळा : कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी आज रविवारी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने गडाचा परिसर भाविकांनी गजबजला आहे. तर वाहनांच्या वेहेरगाव ते कार्ला फाटा दरम्यान रांगा लागल्याने मोठी वाहतूककोंडी झाली आहे.

    मागील दिड वर्षापासून बंद असलेली मंदिरे घटस्थापनेच्या दिवशी उघडली. देवीच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी नवरात्रीचे नऊ दिवस गडावर हजेरी लावल्याचे सर्वश्रूत आहे. आज देखील रविवारच्या सुट्टीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक वेहेरगाव परिसरात दाखल झाल्याने गर्दी झाली होती. ही कोंडी व गडावरील गर्दी नियंत्रणात आणतांना पोलीस प्रशासनाची मात्र मोठी दमछाक झाली आहे. 

इतर बातम्या