Breaking news

सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सिंहगड ऑलिंपस 2025 कबड्डी विजेतेपद पटकावले

लोणावळा : सिंहगड स्पोर्ट्स असोसिएशनने आयोजित केलेली सिंहगड ऑलिंपस 2025 ही कबड्डी स्पर्धा सिंहगड कॉलेज, कोंढवा कॅम्पस, पुणे येथे पार पडली. आंतर-महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा या संघाने जिंकली.

पुरुष गटात दोन दिवस चाललेल्या या आंतर-महाविद्यालयीन स्पर्धेत विविध संस्थांमधील 29 संघ आणि 350 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना सिंहगड अकादमी ऑफ इंजिनिअरिंग, कोंढवा आणि सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा यांच्यात झाला, ज्यामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा कॉलेजने विजय मिळवला.

      या उत्कृष्ट कामगिरीबद्दल, सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा येथील डॉ. एम.एस. गायकवाड, संकुल संचालक डॉ. एस. डी. बाबर, महाविद्यालयाचे प्राचार्य, लोणावळा संकुलातील इतर प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघाचे कौतुक केले. सहभागी विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक प्रो. शीतल पाटील, शारीरिक शिक्षण संचालक कुमार अदाटे आणि विवेक काळे यांचेही अभिनंदन केले आणि खेळाडूंच्या कौशल्यांना आणि क्रीडा वृत्तीला प्रोत्साहन दिले आहे.

इतर बातम्या