Breaking news

देवगिरी ते लोणावळा असा 330 किलोमीटरचा प्रवास करत श्री भैरवनाथ तरुण मंडळ, कुसगाव चे कार्यकर्ते शिवज्योत घेऊन कुसगावात दाखल

लोणावळा : पारंपरिक वेशभूषा, पारंपारिक वाद्य, उत्कृष्ट सादरीकरण, देखाव्यांमधून समाज प्रबोधन अशा विविध प्रकारे आपले वेगळेपण जपणाऱ्या श्री भैरवनाथ तरुण मंडळ कुसगाव बुद्रुक शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावर्षी देवगिरी ते लोणावळा असा तब्बल 330 किलोमीटरचा प्रवास करत शिवज्योत आणली आहे. मागील वीस वर्षापासून मंडळाचे तरुण कार्यकर्ते महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवरून शिवज्योत घेऊन लोणावळ्यात येत असतात तिथीप्रमाणे साजरी होणारी शिवजयंती श्री भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये व पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. या शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून मावळ तालुक्यामध्ये श्री भैरवनाथ तरुण मंडळ कुसगाव बुद्रुक यांनी आपले वेगळेपण कायम ठेवले आहे. यामुळेच तरुणांमध्ये शिवकार्याचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता इतिहास तरुण पिढीला कायम स्मरणात रहावा, याकरिता कुसगाव येथील तरुण कार्यकर्त्यांच्या वतीने दरवर्षी शिवजयंती पारंपारिक पद्धतीने व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत साजरी केली जाते. 2005 सालापासून मंडळाचा इतिहास पाहता दरवर्षी नवनवीन किल्ल्यांवरून शिवज्योती आणण्यात आल्या आहेत.

        वर्ष 2005 किल्ले कोराईगड ( 24 कि.मी. ता. मुळशी, पुणे), वर्ष 2006 किल्ले राजमाची (19 कि.मी., ता. मावळ , पुणे), वर्ष 2008 किल्ले लोहगड (11 कि.मी. ता. मावळ, पुणे), वर्ष 2009 किल्ले कोराईगड (24 कि.मी. ता. मुळशी, पुणे), वर्ष 2010 किल्ले रायगड (165 कि.मी. ता. महाड, रायगड),  वर्ष 2011 किल्ले प्रतापगड (207 कि.मी. ता. जावळी, सातारा), वर्ष 2012 किल्ले राजगड, (129 कि.मी. ता. वेल्हे, पुणे), वर्ष 2013 किल्ले सज्जनगड (191 कि.मी. ता. सातारा, जि. सातारा), वर्ष 2014 किल्ले सुवर्णदुर्ग (211 कि.मी. ता. दापोली, रत्नागिरी), वर्ष 2015 किल्ले रामशेज (255 कि.मी. ता. दिंडोरी, जि.नाशिक), वर्ष 2016 किल्ले धर्मवीरगड (167 कि.मी. ता. श्रीगोंदा, जि.नगर), वर्ष 2017 किल्ले हरिहरगड (264 कि.मी. ता. त्रबंकेश्वर, नाशिक), वर्ष 2018 किल्ले शिवनेरी (124 कि.मी. ता. जुन्नर, जि. पुणे), वर्ष 2019 किल्ले विशाळगड (321 कि.मी. ता. शाहुवाडी, कोल्हापुर), वर्ष 2020 किल्ले सिंधुदुर्ग (457 कि.मी. ता. मालवण, सिंधुदुर्ग), वर्ष 2021 किल्ले राजमाची (19 कि.मी., ता. मावळ, पुणे), वर्ष 2022 किल्ले अंकाई-टंकाई (282 कि.मी. ता. येवला, नाशिक), वर्ष 2023 किल्ले पुरंदर (116 कि.मी. ता. पुरंदर, पुणे), वर्ष 2024 किल्ले देवगिरी (330 कि.मी. ता. दौलताबाद, छ. संभाजीनगर)

इतर बातम्या