Breaking news

Shivdurga Mitra : शोशाला शिखर सर करणार्‍या शिवदुर्गच्या शिलेदारांचा लोणावळ्यात सन्मान

लोणावळा : हिमालय प्रदेशात रक्षम गावातील बास्पा व्हॅली मधील शोशाला पिक क्लायबिंग मोहीम यशस्वीपणाने सर करत भारतातील पहिली गिर्यारोहक संस्था हा नावलौकिक मिळविलेल्या शिवदुर्ग मित्र या संस्थेच्या शिलेदारांना सन्मान लोणावळ्यात सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ भांगरवाडी यांच्याकडून करण्यात आला.

     शोशाला शिखर सर करणारी शिवदुर्ग ही भारतातील पहिली गिर्यारोहक संस्था ठरली आहे. या पुर्वी भारतामधील कोणीही हे शिखर सर केलेले नव्हते. अशा या टिमचा नवरात्रीच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला. शिवदुर्गचे शिलेदार रोहित वर्तक, समीर जोशी, योगेश उंबरे, ओंकार पडवळ यांचा यामध्ये समावेश होता. 

    भांगरवाडी विभागाचे नगरसेवक देविदास कडू, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत भांगरे पाटील, शेखर वर्तक, अमित आगरवाल, सुभाष खत्री, उदय कुडले, प्रचित सातपुते, श्वेता वर्तक, शिला खत्री, पुष्पलता अनसुरकर, वर्षा भांगरे, वंदना केदार, रुपाली केदारी, कुंदा कांबळे, शोभा आगरवाल यांच्यासह नवरात्र उत्सव मंडळाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान करण्यात आला.

इतर बातम्या