Breaking news

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जीवनावर आधारित "धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे" चित्रपटाचे आज लोणावळ्यात शिवसेनेकडून मोफत आयोजन

लोणावळा : धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जीवनावर आधारित "धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे" हा चित्रपट महाराष्ट्र आज शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला. लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने आज या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो सर्व शिवसेना - युवासेना - महिला आघाडी - वाहतूक सेना व सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक, शिवसैनिक व सर्व लोणावळेकर नागरिकांसाठी मोफत आयोजन करण्यात आले‌ होते. चित्रपट शो चे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व श्रीफळ शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, महिला आघाडी पुणे जिल्हा सहसंपर्क संघटिका शादान चौधरी, तालुका संघटक अंकुश देशमुख, उपतालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, शहर संघटिका कल्पना आखाडे यांच्या हस्ते करण्यात‌ आले.

      यावेळी नगरसेवक शिवदास पिल्लै, समन्वयक जयवंत दळवी, उपशहरप्रमुख संजय भोईर, युवासेना तालुका अधिकारी शाम सुतार, विशाल हुलावळे, अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष हेमंत मेणे, तालुका अध्यक्ष नरेश‌ काळवीट, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, सल्लागार रामभाऊ थरकुडे,‌ सहसंघटिका मनिषा भांगरे, महिला आघाडी उपशहर संघटिका नगरसेविका सिंधू परदेशी, सुरेखा देवकर, युवासेना उपशहर अधिकारी विवेक भांगरे, संतोष मेंढरे, विभाग प्रमुख भगवान देशमुख, रविंद्र टाकळकर, उल्हास भांगरे, विभाग संघटक शेखर कारके, उपविभाग प्रमुख प्रशांत आजगेकर, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे, कैलास पडवळ,‌ सुनिल मराठे, धीरज घारे, कुणाल सपकाळ, शिवाजी आखाडे, विनायक टाकवे, विजय केदारी, रमेश कंधारे, महिला आघाडीच्या प्रिया पवार, अनिता गायकवाड, कविता खजान, मार्गारेट मुन्ना स्वामी यांच्यासह लोणावळेकर व शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक शिवसैनिक मोठ्या संख्येने चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होते.

इतर बातम्या