लोणावळ्यातील तपस्या मते हिची राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी कामगिरी; तीन रौप्यपदकांसह आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

लोणावळा : कर्नाटका पावर लिफ्टिंग असोसिएशन आणि पावर लिफ्टिंग इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दावणगेरे (कर्नाटका) येथे 22 ते 30 जून 2025 दरम्यान आयोजित सब ज्युनिअर, ज्युनियर आणि वरिष्ठ गटातील राष्ट्रीय पातळीवरील पावर लिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेस, लोणावळा येथील कुमारी तपस्या अशोक मते हिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
तिने सब ज्युनिअर 52 किलो वजनी गटात एकूण 322.5 किलो वजन उचलत तीन रौप्य पदकांची कमाई केली. तिच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे तुर्की आणि रूमानिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी तिची निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तपस्याच्या या यशाबद्दल शिवदुर्ग मित्र परिवार, लोणावळा यांच्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.