Breaking news

लायन्स लिजेंड्स लोणावळा क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न; अध्यक्षपदी लायन सौ. वैशाली साखरेकर

लोणावळा : लायन्स लिजेंड्स लोणावळा क्लबचा २०२५-२६ या वर्षासाठीचा पदग्रहण समारंभ काल हॉटेल चंद्रलोक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी लायन एमजेएफ गिरीश मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शपथ घेतली.

      कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लायन धनंजय धुमाळ, विद्याप्रसारिणी सभेच्या अध्यक्षा डॉ. सौ. मृणालिनी गरवारे आणि वसंत व्याख्यानमाला समितीचे उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुराणिक उपस्थित होते. या वर्षासाठी क्लबच्या अध्यक्षपदी लायन सौ. वैशाली धनंजय साखरेकर, सचिवपदी सौ. मीनाक्षी गायकवाड आणि खजिनदारपदी सौ. नूतन घाणेकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत इतर प्रमुख पदांवर खालील सदस्यांची निवड झाली आहे:

प्रथम उपाध्यक्ष: लायन डॉ. प्राची पाटेकर, द्वितीय उपाध्यक्ष: लायन सौ. प्रतिभा दरेकर, तृतीय उपाध्यक्ष: लायन सौ. रोहिणी रसाळ, क्लब जीएलटी चेअरमन: लायन डॉ. हेमंत अगरवाल, क्लब सर्विस चेअरमन: लायन सुरेश गायकवाड, मार्केटिंग चेअरमन: लायन रमेश लूनावत, क्लब मेंबरशिप चेअरमन: लायन अमित अगरवाल आणि लायन सौ. उमा मेहता, सहसचिव: लायन सौ. मोनिका अगरवाल, सहखजिनदार: लायन सौ. कीर्ती अगरवाल, आयपीपी: लायन गोरख चौधरी तसेच संचालक मंडळामध्ये लायन नंदकुमार वाळंज, लायन सौ. वत्सला वाळंज, लायन राजेश मेहता, लायन बनवारीलाल गुप्ता, लायन डॉ. वामनराव गुजर, लायन विवेक घाणेकर, लायन हेमंत पाटेकर, लायन रामदास दरेकर, लायन विजय रसाळ, लायन मनोज लऊळकर, लायन डॉ. श्रीकांत रावण, लायन समीर भल्ला, लायन धनंजय साखरेकर, लायन अमित बॅनर्जी व लायन दीपक जैन यांचा समावेश आहे. कार्यक्रमात नव्याने क्लबमध्ये सामील झालेल्या सदस्यांना लायन डॉ. हेमंत अगरवाल यांनी लायन्स क्लबच्या कार्यपद्धती, नियमावली आणि जबाबदाऱ्या समजावून देत शपथ दिली.

लायन्स एक्सलन्सी अवॉर्ड प्रदान

यावर्षी "लायन्स एक्सलन्सी अवॉर्ड" तीन नामांकित संस्थांना देण्यात आले.

1} विद्याप्रसारिणी सभा – १०१ वर्षांची उज्वल परंपरा आणि शैक्षणिक योगदानासाठी

2} वसंत व्याख्यानमाला समिती – २३ वर्षांपासून समाजप्रबोधन करणाऱ्या व्याख्यानमालेच्या आयोजनासाठी

3} सोमनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, नांगरगाव – वृद्धांच्या सेवेसाठी सक्रिय सहभागासाठी

या सर्व संस्थांना सन्मानचिन्ह आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेची फ्रेम देऊन गौरवण्यात आले.

      प्रमुख अतिथी लायन गिरीश मालपाणी यांनी ‘नेतृत्व’ या विषयावर बोलताना क्रिकेटपटू एम.एस. धोनीचे उदाहरण देत, लायन्स सदस्यांनी कार्यात नेतृत्वगुण दाखवावेत असा संदेश दिला. आपल्या भाषणात त्यांनी ऐतिहासिक, धार्मिक व क्रीडा क्षेत्रातील उदाहरणांची उत्तम सांगड घालून प्रेरणा दिली. नवीन अध्यक्षा लायन सौ. वैशाली साखरेकर यांनी आपल्या कार्यकाळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यामध्ये वाड्या-वस्त्यांतील मुलांसाठी शाळा उभारणे, लोणावळा परिसरात पाणपोई, टॉयलेट ब्लॉक आणि एक कम्युनिटी हॉल उभारण्याचे तसेच लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने मोफत डोळ्यांच्या तपासणी व उपचारांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्याची घोषणा केली.

     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लायन सौ. उमा मेहता व लायन सौ. प्रतिभा दरेकर यांनी केले. आभार प्रदर्शन लायन रमेश लूनावत यांनी केले. लायन डॉ. हेमंत अगरवाल यांनी गिरीश मालपाणी यांचा, तर लायन सौ. नूतन घाणेकर यांनी अध्यक्षा सौ. साखरेकर यांचा परिचय करून दिला. लायन राजेश मेहता यांनी एक्सलन्सी अवॉर्डबाबत माहिती दिली. लायन विवेक घाणेकर यांनी ध्वजवंदना सादर केली, लायन रामदास दरेकर यांनी गतवर्षाचा अहवाल, तर लायन विजय रसाळ यांनी आर्थिक लेखाजोखा सादर केला. माजी अध्यक्ष लायन गोरख चौधरी यांनी आपल्या कार्यकाळातील उपक्रमांचा आढावा मांडला. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

        या कार्यक्रमास लोणावळा व खंडाळ्यातील लायन्स आणि रोटरी क्लबचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या

आषाढी वारीचा उत्सव पद्मश्री डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालयात उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा हरिनामात उत्स्फूर्त सहभाग, वारकरी वेशभूषा अन् पालखीने भारावले वातावरण

लोणावळ्यात केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांची व्यापारी संघाने घेतली भेट; ब्लिंकिट ऑनलाईन सर्व्हिस मुळे लोणावळ्यातील लहान व्यवसायिकांवर मोठा परिणाम होत असल्याची मांडली खंत