Breaking news

औद्योगिक सहकारी क्षेत्रातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत सहकार परिषद संपन्न; लोणावळा वसाहतीच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

लोणावळा : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स  इंडस्ट्रीज व अँग्रीकल्चर आयोजित सहकार परिषद मुंबई येथे आयोजित करण्यात  आली,. केंद्रित गृह व  सहकार मंत्री अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ,कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद आयोजित करण्यात आली,. महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशन सह लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहतीचे पदाधिकारी या परिषदेला उपस्थित होते,

       परिषदेत,१९८५ पासून प्रलंबित २२, प्रश्न मांडण्यात आले. मंत्री सामंत यांनी यावेळी शासनाने निर्गमित केलेले, ३ एप्रिल २०२४  चे जाचक परिपत्रक तसेच, ५ जून २०२४ चे भुखंड हस्तांतरण संदर्भातील पत्र  रद्द केले असल्याचे सांगितले. शासनाने निकषितब केलेला आकृतीबंध लहान सहकारी औद्योगिक वसाहतींना सामावून घेण्यासाठी,  अ  ब  क वर्गवारी तालुक्यातील औ वसाहतींना १०:९०, आकृतीबंधानुसार ड व ड अधिक विना उद्योग तालुका व नक्षलवाद प्रभावित क्षेत्र ०५:९५, खासगी वसाहतींना ५०:५० आकृतीबंधानुसार उपरोक्त निधी शासन औद्योगिक वसाहतींना देणार असल्याचे सांगितले. तसेच यासंदर्भातील ज्या प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.     

        यासंदर्भात येत्या सप्टेंबर महिन्यात आढावा बैठक घेण्यात येणार असून, १२४ सहकारी औद्योगिक वसाहतींची उद्योग परिषदही आयोजित करणार असल्याचे ते म्हणाले. परिषदेत महाराष्ट्र राज्य सह. औद्योगिक वसाहत फेडरेशन सांगलीचे चेअरमन सचिन पाटील, व्हाइस चेअरमन विजय लोखंडे, संचालक नामकर्ण आवारे, जुन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अमित बेनके, फेडरेशनच्या संचालिका मोनिका गावडे, लोणावळा औद्योगिक वसाहतीचे चेअरमन व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे इंडस्ट्रीज व अँग्रीकल्चर चे सदस्य, संदीप कोराड, कळवण सहकारी औ वसाहतीचे व्हाइस चेअरमन डॉ किशोर कुंवर, वसंतदादा सहकारी, औ वसाहत सांगलीचे सभासद शरद पाटील, सिन्नर औ वसाहतीचे संचालक रामदास  डापसे, संदीप पगारे, जुन्नर सहकारी औ वसाहतीचे सभासद जयेश कोकणे, स्वप्नील सरोदे,लोणावळा औ वसाहतीच्या व्हाइस चेअरमन शीतल पतंगे, संचालक नितीन सोनवणे, निलेश वर्तक, देवराम लोखंडे, संस्थेचे सभासद गिरीश पारेख, महेंद्र कांकरिया आयुष कांकरिया, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्व पदाधिकारी  राज्यातील विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या

आषाढी वारीचा उत्सव पद्मश्री डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालयात उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा हरिनामात उत्स्फूर्त सहभाग, वारकरी वेशभूषा अन् पालखीने भारावले वातावरण

लोणावळ्यात केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांची व्यापारी संघाने घेतली भेट; ब्लिंकिट ऑनलाईन सर्व्हिस मुळे लोणावळ्यातील लहान व्यवसायिकांवर मोठा परिणाम होत असल्याची मांडली खंत