मोठी बातमी l लोणावळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का; पक्षांतर्गत गटा तटाच्या राजकारणाला कंटाळून अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश

लोणावळा : लोणावळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षांतर्गत असलेल्या गटा तटाच्या राजकारणाचा कंटाळून अनेकांनी शिवसेना शिंदे पक्ष मध्ये आज प्रवेश केला आहे. मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीमध्ये हा शिवसैनिकांचा प्रवेश करून घेण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोणावळा उपशहर प्रमुख प्रकाश पाठारे, दुसरे उपशहर प्रमुख विजय आखाडे, माजी नगरसेविका व महिला आघाडी अध्यक्ष कल्पना आखाडे, माजी नगरसेविका सिंधुताई परदेशी, सह शहर संघटिका प्रिया पवार, विभाग संघटिका अनिता गायकवाड व मायग्रेट मुन्नास्वामी, विभाग प्रमुख मंगेश येवले, उपविभाग प्रमुख अनिल कालेकर यांच्यासह कल्पेश तीखे, दुर्वेश कडू, प्रणव तिकोने, संकेत जाधव, आदित्य शिंदे, दुर्वेश बोडके, प्रथमेश पाठारे, यांनी महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थित मधे शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश केला आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, संघटक अंकुश देशमुख, तालुका प्रमुख राजूभाऊ खांडभोर, उपतालुका प्रमुख राम सावंत, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, देहू शहरप्रमुख सुनिल हगवणे, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, समन्व्यक नंदूभाऊ कडू, महिला आघाडी शहर संघटिका मनिषा भांगरे, युवासेना अधिकारी विवेक भांगरे आदी उपस्थित होते.