Breaking news

ज्येष्ठ वारकरी रामभाऊ निंबळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन

पवनानगर : मावळ तालुक्यातील वारू येथील शेतकरी कुटूंबातील ज्येष्ठ नेते व ज्येष्ठ वारकरी हभप रामभाऊ ( नाना ) केरू निंबळे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने वयाचे 100 व्या वर्षी निधन झाले. आळंदी पंढरीचे नैमित्तिक वारी करणारे आणि जुन्या काळातील उत्कृष्ट मृदुंगाचार्य म्हणुन त्यांची ख्याती होती. घरची परिस्थिती हलाखीची असतानासुद्धा राजकिय क्षेत्रात जनसंघाच्या काळापासून कठीण परीस्थितीत त्यांनी तळागाळात पक्ष संघटन वाढविण्यासाठी काम केले. सांप्रदायिक क्षेत्रात ज्ञानेश्वरी भागवतासारखे ग्रंथ त्यांचे मुखोद्गत झाले होते. सत्यवचनी आणि रोखठोक स्वभावाचे म्हणुन त्यांची ओळख होती. 

  त्यांच्या मागे चार मुले आणि एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गायनाचार्य बाळासाहेब निंबळे, कोथुर्णे सोसायटीचे मा. चेअरमन तुकाराम निंबळे, निवृत्ती निंबळे आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पुणे जिल्हा सहसचिव दिनकर निंबळे यांचे ते वडील होत.

इतर बातम्या