Breaking news

Maval News | महाविकास आघाडीच्या मावळ तालुका प्रचार प्रमुख पदी भारत ठाकूर यांची निवड

लोणावळा : महाविकास आघाडीच्या मावळ तालुका प्रचार प्रमुख पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर यांची आज निवड करण्यात आली.

     मावळ लोकसभेचे समन्वयक केसरीनाथ पाटील, तालुका संपर्क प्रमुख प्रभाकर पवार, सह समन्वयक राऊत, तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, तालुका संघटक मदन शेडगे, शांताराम भोते, यशवंत तुरडे, युवासेना प्रमुख उमेश गावडे, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, समन्वयक रवी गायकवाड, मारुती खोले, कामशेत शहरप्रमुख सतीश इंगवले, वडगाव शहर प्रमुख संतोष ढोरे, राहुल नखाते, विभाग प्रमुख गणेश लष्करी, भरत भोते, नितीन पिंगळे या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.

     येत्या 18 एप्रिल पासून मावळ लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने भारत ठाकूर यांच्याकडे प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली मावळ तालुक्यामध्ये प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार आहे.

इतर बातम्या