Breaking news

School News : भाजे येथे महाकवी 'कालिदास दिन' उत्साहात साजरा

मळवली : श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयात मोठ्या उत्साहाने  'संस्कृत दिन' म्हणजेच महाकवी 'कालिदास जयंती दिन' साजरा करण्यात आला. कोरोना काळानंतर विद्यालयात कार्यक्रम झाल्यामुळे सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमासाठी वि .प्र .सभेचे कार्यवाह तसेच शाला समितीचे अध्यक्ष सतिश गवळी व मुख्याध्यापिका वर्षा क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत शिक्षक गहिनीनाथ बारगजे यांनी केले तसेच महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा परिचय विद्यार्थ्याना करून दिला. कार्यक्रमात भगवद् गीतेतील बारावा अध्याय व 'मधुराष्टकम्' यांचे सामूहिक पठण करण्यात आले. तसेच नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत सुभाषिते व त्याचा अर्थ सांगितला. जेष्ठ शिक्षक मकरंद गुर्जर यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत दिनानिमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागर अंजू व शेलार धनश्री यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब कोकणे यांनी केले. यावेळी शिक्षक रोहिदास डिकोळे, संभाजी तुपे, राजेंद्र होले, श्रीराम तांदळे, ललिता पवार, सुरेखा आहिरे, कविता गायकवाड उपस्थित होते. शिक्षकेतर मुकुंद भोसले, नामदेव कडू यांनी कार्यक्रम संयोजनासाठी परिश्रम घेतले.

इतर बातम्या