Breaking news

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी घेतले लोणावळ्यात गणरायाचे मनोभावे दर्शन

लोणावळा : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे उपसभापती सचिन भाऊ अहिर यांनी गणेशोत्सवानिमित्त लोणावळ्यात भेट देत गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची पूजा-अर्चा करून लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

       सचिन अहिर यांच्या लोणावळा दौऱ्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, उपशहर प्रमुख नरेश कळविट, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, शहर समन्वयक नंदू कडू, सल्लागार पराग राणे, उपविभाग प्रमुख नरेश घोलप, माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गवळी, नगरसेवक धनंजय काळोखे, माजी नगरसेवक विलास बडेकर, माजी नगरसेवक बाळासाहेब शिर्के, विशाल पिसे, संजोग पिसे, राज पिसे उपस्थित होते.

तसेच महिला आघाडी शहर संघटिका मनिषाताई भांगरे, उपशहर संघटिका अनिता गायकवाड, उपशहर संघटिका दिपाली शिरंबेकर, उपविभाग प्रमुख गणेश इवरे, दिनेश जाधव, सोशल मीडिया मावळ प्रमुख यशोधन शिंगरे, विनय सिंग आणि अनुप जीर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

      गणरायाच्या दर्शनाच्या निमित्ताने उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सचिन अहिर यांचे स्वागत केले. यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील उत्सवाचे वातावरण आणि विविध सामाजिक उपक्रमांबाबतही चर्चा झाली. शिवसेनेच्या वतीने विसर्जन मिरवणुकीच्या वेळेत लाडू व पाणी वाटपाचा जो उपक्रम राबवला जातो त्याचे देखील सचिन भाऊंनी कौतुक केले.


इतर बातम्या