Breaking news

मोठी बातमी : उर्से टोल नाका येथे नाकाबंदी दरम्यान वाहनातून 50 लाख रुपयांची रोकड जप्त

तळेगाव दाभाडे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हद्दीत सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. उर्से टोल नाका याठिकाणी नाकाबंदी दरम्यान एका वाहनामध्ये तब्बल 50 लाख रुपयांनी रोकड मिळून आली आहे. याबाबत वाहन चालकाकडून समाधानकारक खुलासा करण्यात न आल्याने सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे. 

      पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नऊ ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे देखील तपासणी नाका आहे. या नाक्यावर मंगळवारी (दि. 26) शिरगाव पोलिस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका चारचाकी वाहनामध्ये 50 लाख रुपये रोख रक्कम मिळून आली. पोलिसांनी रोकडबाबत विचारणा केली असता संबंधित वाहन चालकास योग्य खुलासा करता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी रोकड जप्त केली. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात असून कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याचेही पोलिस उपायुक्त बांगर यांनी सांगितले.

इतर बातम्या