Breaking news

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात दरड कोसळली

खोपोली : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोरघाटात दरड कोसळल्याने पुण्याच्या दिशेने येणारी वाहतुक विस्कळीत झाली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार खोपोलीच्या हद्दीत एक्सप्रेस वेवर रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याठिकाणी जोरदार पावसामुळे डोंगरावरून राडोरोडा व दगड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती समजताच आयआरबीचे पथक व बोरघाट पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून यंत्राच्या सहाय्याने सदर दरड व मातीचा राडारोडा बाजुला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे. दरम्यान या घटनेने रस्त्यावर मोठया प्रमाणात माती आल्याने चिखल झाला आहे. पुण्याकडे जाणार्‍या दोन लेन साडेदहाच्या आसपास सुरू करण्यात आल्या असून चिखलमय रस्त्यावरून धिम्या गतीने वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

इतर बातम्या