Breaking news

Pune Corona Update : पुणे जिल्ह्यात रविवारी 10 हजार 102 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग; संसर्गाचा दर 26 टक्के कायम

पुणे : पुणे जिल्ह्यातील 10 हजार 102 नागरिकांना रविवारी कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 12 लाख 49 हजार 885 ऐवढी झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यातील आठ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 19 हजार 292 झाली आहे. पुणे जिल्ह्यात 39 हजार 324 चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 19 हजार 119 चाचण्या पुणे शहरात झाल्या. त्यामुळे शहराचा संसर्ग दर हा 28.11 टक्के तर जिल्ह्याचा संसर्ग दर 26 टक्के झाला आहे. दिवसभरात आढळलेल्या 10 हजार 102 रुग्णांपैकी 5375 रुग्ण पुणे शहरातील, 2626 रुग्ण पिंपरी चिंचवड मधील व उर्वरित 2101 पुणे जिल्ह्यामधील आहे. तर मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी पुणे शहरातील 5, पिंपरी चिंचवड 1 व जिल्ह्यातील 2 जणांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात ओमायक्राॅनचे 701 रुग्ण

रविवारी पुणे जिल्ह्यात ओमायक्राॅनचे 8 रुग्ण मिळून आले आहेत. यापैकी 5 रुग्ण पुणे शहरातील तर 3 जण पिंपरी चिंचवड परिसरातील आहे. या आठ रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 701 झाली आहे.

इतर बातम्या