Breaking news

Pune - Lonavala Local | पुणे-लोणावळा उपनगरीय लोकल सेवेला आज 46 वर्ष पुर्ण

लोणावळा : पुण्याची उपनगरीय रेल्वे सेवा अर्थातच "पुणे सबअर्बन रेल्वे नेटवर्क" अशी ओळख असलेल्या पुणे - लोणावळा लोकल ला आज 11 मार्च 2024 रोजी 46 वर्ष पुर्ण होत आहे. 

      11 मार्च 1978 रोजी पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय ईएमयु लोकल सेवेला आरंभ झाला. सुरुवातीला 7 डबे असलेली ईएमयु लोकल ही धावली, नंतर 9 तर आता सध्या 12 डब्याची ईएमयु लोकल धावते आहे. मागच्या 46 वर्षाच्या इतिहास पाहिला तर एकदाही पुण्याला नवीन फ्रेश फॅक्टरी आऊट ईएमयु रेक मिळाला नाही. मुंबई उपनगर मध्ये वापरून पुण्याला दिलेल्या जुन्या रेक मधूनच पुणे-लोणावळा प्रवास होत आहे. 46 वर्षामध्ये पदार्पण करताना यंदा तरी पुण्याला बंबार्डिअर किंवा मेधा ईएमयु चा नवीन रेक मिळावा अशी अपेक्षा पुणे ते लोणावळा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

       तसेच गेल्या 46 वर्षात पुणे लोणावळा लोकलच्या फेऱ्यांमध्येही वाढ झालेली नाही. आता स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम लोणावळा ते पुणे दरम्यान पुर्ण झाल्याने प्रवाशांकडुन कार्यालयीन वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच सर्वच स्टेशन वरील फलाटांची लांबी वाढवली असल्याने सकाळच्या व सायंकाळच्या काही फेऱ्या या 15 डब्यांच्या लोकलने पण चालवता येऊ शकतात, याचा देखील मध्य रेल्वे प्रशासनाने विचार करावा अशी मागणी प्रवाशी संघटना करत आहेत.

हे आहेत लोकल चे टप्पे :

✓ 1978 ते 2007-08 सालापर्यंत पुणे लोकल ही डीसी (डायरेक्ट करंट) लोकल म्हणून धावत होती. 

✓ 2009-10 मध्ये भेल चा रेक पुण्याला मिळाला.

✓ 2014-15 मध्ये एसी (अल्टरनेट करंट) ईएमयु धावू लागली. 

✓ 2015 ते 2018 या काळात रेट्रोफिटेड रेक चा वापर करून लोकल धावू लागली. 

✓ 2018 ते आत्तापर्यंत सिमेन्स रेक पुणे ते लोणावळा दरम्यान धावत आहे.



(इक्बाल भाई मुलाणी/ अध्यक्ष पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघ)

इतर बातम्या