Breaking news

Maval News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "परीक्षा पे चर्चा" कार्यक्रम वडगाव मधील शाळांमध्ये संपन्न

वडगाव मावळ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या आपल्या प्रश्नोत्तारामध्ये शालेय विध्यार्थ्यांची गुणात्मक कौशल्यांची वाढ होण्यासाठी या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संपूर्ण देशभर या कार्यक्रमाचे आयोजन होत असताना आज वडगाव मधील न्यू इंग्लिश स्कूल & ज्युनियर कॉलेज व रमेशकुमार सहानी इंग्लिश मिडीयम स्कूल या ठिकाणी शासनाच्या आदेशानुसार हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना  ऑनलाईन पद्धतीने शाळेच्या वतीने दाखविण्यात आला.

    यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना स्थानिक विद्यार्थी व शिक्षक यांना सुद्धा या कार्यक्रमाचा अभ्यासपूर्वक अनुभव मिळाला. याप्रसंगी वडगाव भाजपा  अध्यक्ष अनंता कुडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, माजी सरपंच नितीन कुडे, संभाजी म्हाळसकर, युवक अध्यक्ष विनायक भेगडे, नगरसेवक किरण म्हाळसकर, रवींद्र म्हाळसकर, भूषण मुथा, मकरंद बवरे, हरीश दानवे आदीसह शाळेचे अध्यक्ष राजेंद्र म्हाळसकर, शिक्षक लक्ष्मणराव आगळमे, शिक्षिका शोभा सूर्यवंशी तसेच अनेक शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या