Breaking news

Lonavala Good News : प्रा. नितीन तावरे यांना फाईन आर्टस चित्रकलेतील पीएचडी

लोणावळा : लोणावळ्यातील युवा चित्रकार प्राध्यापक नितीन अरुण तावरे यांना फाईन आर्ट (अल्पाईड आर्ट्स) या विषयांमध्ये डॉक्टरेट पदवी (पीएचडी) प्राप्त झाले आहे.

    प्राध्यापक नितीन तावरे यांनी जयपुर राजस्थान येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिपरेवाल विद्यापीठातून चित्रकलेतील फाईन आर्ट (अल्पाईड आर्ट्स) या विषयातील इनोव्हेटिव्ह पॅकेजिंग डिझाईन व त्यांचा ग्राहकांवर होणारा प्रभाव या विषयावर प्रबंध सादर केल्यामुळे त्यांना डॉक्टरेट पदवी (पीएचडी) मिळाली आहे. 

प्राध्यापक तावरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे लोणावळ्यातील डॉ. बी. एन. पुरंदरे बहुविध विद्यालय येथे झाले आहे. तर फाईन आर्टस मधील जी.डी.आर्ट्स (कमर्शियल आर्ट्स) व डि.पी.एड. (डिप्लोमा इन आर्ट्स एज्युकेशन) चित्रकला पदवीचे शिक्षण पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात पूर्ण केले आहे. तसेच मास्टर इन फाईन आर्टस (एमएफए) हे पदवीचे शिक्षण घेतले असून ते आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अल्पाईड आर्ट्स अँड क्राफ्ट येथे मागील 14 वर्षांपसून चित्रकला विषयातील विविध विभागाचे मार्गदर्शन करत आहे.

प्राध्यापक तावरे यांनी विविध महाविद्यालयात परीक्षणाचे काम केले असून, त्यांचे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन मध्ये पेपर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना नुकताच आर्ट्स बिट्स फौंडेशनच्या वतीने 'महाराष्ट्र गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच 2021 साली ख्यातनाम चित्रकार 'आर. के. लक्ष्मण कलारत्न' पुरस्कारानेही सन्मान करण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शन झाली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

इतर बातम्या