Breaking news

Maval Good News l महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या वतीने नंदकुमार काळोखे यांना ज्येष्ठ कबड्डी पंच पुरस्कार जाहीर

देहूगाव : देहूगाव येथील राष्ट्रीय कबड्डी पंच व धनकवडी पुणे येथील जगन्नाथ क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ नंदकुमार काळोखे यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या वतीने कबड्डी महर्षी स्व. शंकरराव उर्फ बुवा यांच्या जन्मदिना निमित्त (कबड्डी दिना निमित्त) जेष्ठ कबड्डी पंच पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

       नंदकुमार काळोखे हे देहूगावचे सुपुत्र असून त्यांनी 44 वर्षे कबड्डी क्षेत्रात पंच म्हणून काम केले आहे. पुणे येथील हिरे हायस्कुल मध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक व नंतर प्राचार्य म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. त्यांना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन यापूर्वी गौरविण्यात आले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या या कारकिर्दीत अनेक खेळाडू घडविले आहेत. शिवाय अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ते लेझीम व झांज यांचे तज्ञ मार्गदर्शक असून या बाबतीत त्यांनी चेन्नई, गोवा, दिल्ली या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन केले आहे. शालेय, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशियशन च्या वतीने 15 जुलै हा कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव (बुवा) यांचा जन्म दिवस कबड्डीदिन म्हणून प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र राज्य कबड्डी अशोसीएनचे अध्यक्ष आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या 24 व्या कबड्डीदिनी, म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल मध्ये अमृत कलश देऊन

सन्मानित करण्यात येणार आहे. या निमित्ताने किशोर कुमार व खुला गट राष्ट्रीय स्पर्धेत राज्य संघातून खेळताना विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या उत्कृष्ट खेळाडूंचा शिष्यवृत्ती, पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येते. तसेच कबड्डी क्षेत्रातील जेष्ठ कार्यकर्ता, जेष्ठ पंच, जेष्ठ खेळाडू, सातत्यपूर्ण स्पर्धा आयोजक, संस्था यांचा गौरव करण्यात येतो.

इतर बातम्या