Breaking news

Kaivalydham : कैवल्यधाम योग संस्थेच्या वतीने सहयोगी भी योगी पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान सोहळा संपन्न

लोणावळा : जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेच्या गोर्धनदास सेकसरिया योग महाविद्यालायातील Post Graduate Diploma in Yoga Education Course 2023-24 च्या निरोप समारंभ निमित्त लोणावळ्यातील 7 मान्यवर व्यक्तींचा सहयोगी भी योगी हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच श्रीमती भगवतीदेवी बाबुराम तिवारी पुरस्कार आणि श्री रामेश्वर प्रसाद नेवातीया शिष्यवृत्ती देऊन उल्लेखनीय कामगिरी केलेल्या योग महावि‌द्यालायातील गुणवंत विध्यार्थ्यांचा सन्मान पूज्य स्वामी परमात्मानंद यांच्या शुभहस्ते शनिवारी (20 एप्रिल) रोजी कुडीलाल सभागृहामध्ये करण्यात आला. यावेळी कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, डॉ. वर्तिका दुबे, प्राध्यापक डॉ. रणजीत सिंग भोगल, प्राचार्या बंदिता सतपते आदी मान्यवर तसेच कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी वर्ग, योग महावि‌द्यालयातील वि‌द्यार्थी तसेच लोणावळ्यातील मान्यवर व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     कार्यक्रमाची सुरुवात शांतीपाठ आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्राचार्या बंदिता सतपते यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रमुख पाहुणे पूज्य स्वामी परमात्मानंद सरस्वती यांचा परिचय करून दिला. संस्थेचे सचिव सुबोध तिवारी यांनी प्रमुख पाहुणे यांचा शाल आणि कैवल्यधाम शताब्दी वर्षाची मुद्रा देऊन सन्मान केला. यावेळी विध्यार्थ्यांनी आपले मनोगत आणि अनुभव व्यक्त केला. तसेच योग शिक्षक डॉ. रजनीश शर्मा यांनी वि‌द्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

       कैवल्यधाम संस्थेस लोणावळ्यातील ज्या मान्यवर व्यक्तींचा सहयोग लाभला त्यांचा संस्थेचे मानद सचिव सुबोध तिवारी यांनी संक्षिप्त परिचय करून दिला. त्यांना पूज्य स्वामी परमात्मानंद सरस्वती (Founder Acharya of Arsha Vidya Mandir ) यांच्या हस्ते सहयोगी भी योगी पुरस्कार देऊन लोणावळा उपविभागाचे पोलीस उप अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक, संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. अमोल अगरवाल, श्रद्धा हॉस्पिटलचे डॉ. शैलेश शहा व डॉ. अंजना शहा, लोणावळा मुख्याधिकारी अशोक साबळे, बिधिवरसिटी टाटा पॉवरचे प्रमुख विवेक विश्वास राव, हॉस्पिटॅलिटी प्रोफेशनल उदित शर्मा यांना सन्मानित करण्यात आले.

   तसेच संस्थेच्या गोर्धनदास सेकसरिया योग महाविद्यालयातील गुणवंत विध्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे पूज्य स्वामी परमात्मानंद सरस्वती आणि श्रीमती वर्तिका दुबे, प्राध्यापक रणजीत सिंग भोगल यांच्या हस्ते पुरस्कार आणि शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले.

श्रीमती भगवतीदेवी बाबुराम तिवारी पुरस्कार चे मानकरी ठरले. जितेश सिंगला, रमेश अय्यर, कुमारी प्रग्या अजमेरा, कुमारी श्रीयानी सुवार्डेकर तर श्री रामेश्वर प्रसाद नेवातीया प्रसाद शिष्यवृत्ती चे मानकरी ठरले, सचिन, जितेश सिंगला, कुमारी पूर्वा सातकर, कुमारी प्रग्या अजमेरा.

       यानंतर प्रमुख पाहुणे पूज्य स्वामी परमात्मानंद सरस्वती यांनी उपस्थितांना आपल्या अमृतवाणीने संबोधित केले. योग शिक्षिका कुमारी ममता बिष्ट यांनी सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता "पूर्णमदम" मंत्राने करण्यात आली. लोणावळ्यात कैवल्यधाम योग संस्थेची स्थापना 1924 साली स्वामी कुवलयानंद जी यांनी केली असून संस्था यावर्षी 2024 आपली शतकपूर्ती साजरी करत आहे.

इतर बातम्या