मावळ तालुक्यात इयत्ता पहिलीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण सुरू

मावळ माझा न्युज नेटवर्क l नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणी अंतर्गत, इयत्ता पहिलीच्या शिक्षकांसाठी पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 चे तालुकास्तरीय प्रशिक्षण आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माळवाडी येथे सुरू झाले. हे प्रशिक्षण 10 जून ते 12 जून 2025 या कालावधीत चालणार आहे.
आजच्या उद्घाटन प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री. सुदाम वाळुंज यांनी उपस्थित सर्व सुलभक आणि प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रशिक्षणाची रूपरेषा समजावून सांगितली आणि मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. विषय साधन व्यक्ती श्रीमती रुपाली शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी प्रशिक्षण समन्वयक वारू केंद्राच्या केंद्रप्रमुख सुनंदा दहीतुले, भोयरे केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील साबळे, खांडी केंद्राचे केंद्रप्रमुख गंगाराम केदार तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव हे उपस्थित होते. या प्रशिक्षणातून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमानुसार दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे.