Breaking news

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या थोर समाजसेवक नथूभाऊ बाबुराव भेगडे पाटील शाळा क्रमांक दोन शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा 32 वर्षानंतर स्नेह मेळावा संपन्न

तळेगाव दाभाडे : शाळेचे जीवन म्हटलं की त्यातील आठवणी ह्या आयुष्यभर आठवणीतच राहतात. एकदा शाळा सोडली किंवा वयानुसार व्यक्ती त्याकडे परत पाहत नाही. शाळेचे दिवस पुन्हा येत नसले तरी देखील शिक्षक व विद्यार्थ्यांतील गोडी कायम रहावी व शिक्षकांचा कुठेतरी सन्मान व्हावा या हेतूने थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील शाळेच्या शाळा क्रमांक दोनच्या माजी विद्यार्थ्यांनी यशस्वी नियोजन करत 15 डिसेंबर रोजी ईशा हॉटेल या ठिकाणी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता.

      सदर स्नेह मेळाव्यात विद्यार्थ्यांची ओळख, त्यानंतर सर्व शिक्षकांचा सन्मान, सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी तसेच स्नेहभोजन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील आठवणींना यावेळी उजाळा देत गोड गोड आठवणी सांगितल्या. त्यावेळेस शिक्षक असणारे व नंतर मुख्याध्यापक पदी विराजमान झालेल्या शिक्षकांनी देखील सर्व विद्यार्थ्यांचे मनोमन आभार मानत आपण केलेला स्नेह संमेलनामुळे आम्हाला नक्कीच आनंद झाला व शाळा सोडल्यानंतर परत भेटू की नाही असे असताना आपण दिलेल्या सुखद धक्का नक्कीच मनाला एक वेगळे समाधान देऊन गेला अशा भावना व्यक्त केल्या. प्रथमताच अशा प्रकारचा स्नेह मेळावा आयोजित केल्याबद्दल शिक्षकांनी आनंद व्यक्त केला. तानाजी गोंदके, सुरेखा जाधव, सोपान आल्हाट, सूर्यकांत भोसले, माने सर, चांदे सर व इतर शिक्षक यावेळी उपस्थित होते.

      सचिन काळदंते, नारायण कवितके, योगेश जव्हेरी, दीपक दाभाडे, कमलेश होनावळे, पिराजी भेगडे, संतोष सुर्से, विशाल फुगे, विजय कुंभार, अनंत टकले, अमित हिरे, संजय मडके, शाम जव्हेरी, सोमनाथ खोंड, महेंद्र कसाबी, सागर जाधव, महेंद्र बोराडे, स्वरूप चक्रनारायण, प्रवीण माने, मोहन डांगे, विश्वास गलीयत, अजय वाघेला, रमेश शिंदे, शिवाजी जवेरी आदी माजी विद्यार्थी या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित होते.

इतर बातम्या