Breaking news

Accident News l मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पाच वाहनांचा अपघात; वाहतूक विस्कळीत

मावळ माझा न्युज नेटवर्क : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Express Way Accident) आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास किलोमीटर 39 जवळ मुंबईच्या मार्गिकेवर पाच वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एक टेम्पो नव्याने बनवलेल्या बोगद्यामध्ये पलटी झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ही विस्कळीत झाली होती. साडेसहा वाजण्याच्या सुमारास सदरचा पलटी झालेला टेम्पो सरळ करत सर्व अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. दरम्यान या घटनेमुळे मुंबई मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागून वाहतूक विस्कळीत झाली होती. विस्कळीत झालेली वाहतूक सकाळी नऊ वाजले तरी अद्यापही सुरळीत झालेली नाही. धीम्या गतीने वाहने पुढे सरकत आहेत.


इतर बातम्या