Breaking news

Maharashtra Rangers : महाराष्ट्राच्या गिर्यारोहणातील वजीर असलेला "वजीर सुळका" सर करून दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना

लोणावळा : ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहुली किल्ला आहे. याच परिसरात 250 फूट उंच असलेला वजीर सुळका प्रस्तरा रोहणासाठी अति कठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी कात्बाव (चाफ्याचा पाडा) गावातून तीन तासाची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. 

    दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजूंना खोल दरी, पाठीवर ओझे, यातून थोडंजरी पाऊल घसरले तर त्या व्यक्तीला दरीच्या जबड्यात विश्रांती मिळते अशी चर्चा केली जाते. पाण्याची प्रचंड कमतरता आणि त्यानंतर वजीर सुळक्याची 250 फुटांची 90 अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करावी लागते. शारीरिक आणि मानसिकतेचा कस पाहणारी मोहीम म्हणून या वजीर मोहिमेकडे पहिले जाते. 

       महाराष्ट्राच्या गिर्यारोहणातील वजीरच असलेला हा वजीर सुळका सर करण्याचे ध्येय उराशी बाळगून जिद्द चिकाटी आणि साहस याच्या जोरावर महाराष्ट्र रेंजर्स च्या धडाकेबाज गिर्यारोहकांनी 26 जानेवारीला केले. महाराष्ट्र रेंजर्स संस्थेचे गिर्यारोहक प्रदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वजीर सुळका सर करून गिर्यारोहण क्षेत्रात एक यशस्वी पाऊल पुढे टाकले आहे.  या मोहिमेत महाराष्ट्र रेंजर्स संस्थेचे लीड क्लायम्बर विक्रमवीर तानाजी केंकरे यांनी मोहिमेची धुरा सांभाळली तर त्यांना जगदीश पालवे यांनी मोलाची साथ दिली आणि वजीर सुळक्यावर प्राणप्रिय भारतीय राष्ट्रधज फडकाऊन मानवंदना दिली. यानंतर त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र रेंजर्स संस्थेचे अखिल सुळके, सुनील येवले, अमित मोरे, मनीष लाड, उज्वल चौधरी यांनीही वजीर सुळका सर केला. या मोहिमेत ड्रीम एडवेंचर संस्थेचे गिर्यारोहक प्रथमेश रसाळ यांनीही भाग घेऊन वजीर सुळका सर केला.

इतर बातम्या