Breaking news

मावळ भाजपा युवा वाॅरियर अध्यक्ष अक्षय पिंगळे याचा वाढदिवस उत्साहात साजरा

लोणावळा : वाकसई गावचे ज्येष्ठ भाजपा नेते तुळशीराम पिंगळे यांचे चिरंजीव व भारतीय जनता पार्टी मावळ युवा वाॅरियर अध्यक्ष  कु. अक्षय तुळशीराम पिंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

      भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी यांनी अक्षयला शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सायली बोत्रे, माजी सभापती गुलाबकाका म्हाळसकर, भाजयुमो प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब गुंड, भाजपा मावळ तालुका सरचिटणीस सखाराम कडू, उद्योजक तुषार विकारी, विकी मोहोळ, कामगार आघाडी उपाध्यक्ष किसनराव येवले, प्रशांत ढाकोळ, भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भाऊ भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

     तरुण पिढी राजकारणाकडे येत आहे ही सकारात्मक बाजु असल्याचे सायली बोत्रे यांनी यावेळी सांगितले. रविंद्र भेगडे म्हणाले युवा वाॅरियर्स च्या माध्यमातून अक्षय याने चांगले संघटन तयार केले आहे. या युवा शक्तीला सोबत घेऊन मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यत पोहचविण्याचे कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

इतर बातम्या