Breaking news

MAVAL SSC RESULT : मावळ तालुक्यातील 30 शाळांचा दहावीचा निकाल 100 टक्के; तर तालुक्याचा एकूण निकाल 94.73 टक्के

लोणावळा : मावळ तालुक्यातील तब्बल 30 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. मावळ तालुक्यातील 83 शाळांमधून 5071 विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावीची बोर्ड परिक्षा दिली होती. त्यापैकी 4804 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मावळ तालुक्याचा दहावीचा निकाल 94.73 टक्के लागला आहे. 4804 उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 1215 विद्यार्थी डिस्टिंगशन मध्ये आले आहेत. 1868 विद्यार्थी फस्ट क्लास, 1362 सेकंड क्लास तर 359 विद्यार्थी पास झाले आहेत.

 मावळ तालुक्यात यंदा दहावी मध्ये 

1) कु. श्रृती किरण सावंत 96 % प्रज्ञान प्रबोधिनी स्कूल शिरगाव मावळ व यश नायबराव गडकर 96 % बालविकास विद्यालय तळेगाव दाभाडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

 2) श्रूती रामदास पिंपळे 95.80 टक्के, पंडित नेहरु विद्यालय कामशेत हीने द्वितीय क्रमांक

3) कु आंटद गायत्री श्रीशैल हीने 95.20 प्रगती विद्या मंदीर तळेगाव दाभाडे हीने तृतीय क्रमांक मिळविला.

100 टक्के निकाल लागलेल्या मावळ तालुक्यातील शाळा : - आँक्झिलियम काॅनव्हेंट हायस्कूल लोणावळा, छत्रपती शिवाजी विद्या मंदिर कान्हे, बी.एन. राजहंस विद्यालय परंदवडी, ज्योतिबा विद्यालय बेबेडोहोळ, श्रीराम विद्यालय नवलाख उंब्रे, छत्रपती शिवाजी हायस्कूल शिवली, संत तुकाराम विद्यालय शिवणे, कर्मवीर विद्यालय आढले बु., पंचक्रोशी हायस्कूल दारुंब्रे, सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे, तुंग माध्यमिक विद्यालय तुंगी, आदर्श विद्या मंदिर तळेगाव दाभाडे, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय करुंज, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय बऊर, जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे, कांतीलाल शहा विद्यालय चाकणरोड, तळेगाव दाभाडे, श्री आनंदराम पी.बी. जैन इंग्लिश स्कूल कामशेत, स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल तळेगाव दाभाडे, महादेवी माध्यमिक विद्यालय इंगळून, एम.के.एस.एस.एस. आश्रमशाळा कामशेत, कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडियम स्कूल तळेगाव दाभाडे, इंद्रायणी इंग्लिश मिडियम स्कूल तळेगाव दाभाडे, सुमन रमेश तुलसीयानी इंग्लिश मिडियम कामशेत, नगरपरिषद माध्यमिक विद्यालय तळेगाव दाभाडे, हंस इंग्लिश मिडियम स्कूल, प्रज्ञाबोधिनी इंग्लिश मिडियम स्कूल, सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल, गीता विद्या निकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, लिली इंग्लिश मिडियम स्कूल. 

    या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.


इतर बातम्या