निधनवार्ता l वाकसई चाळ येथील मधुकर विकारी यांचे निधन
Lonavala : वाकसई चाळ येथील हभप मधुकर तुकाराम विकारी यांचे आज रविवारी (02 जून) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, सून, जावई, नातवंडं असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी सोमवारी (3 जून) सकाळी 10 वाजता वाकसई येथील वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात येणार आहे. मधुकर विकारी हे वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य असून उत्कृष्ट मृदुंगमणी म्हणून त्यांची ओळख होती.