Breaking news

गांजा विक्री करणार्‍या दोन जणांवर लोणावळ्यात गुन्हा दाखल

लोणावळा : गांजा विक्री करणार्‍या दोन जणांवर आज लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दिलीप वामन जाधव व अक्षय दिलीप जाधव (दोघेही राहणार गवळीवाडा, लोणावळा) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

   पोलीस निरीक्षक पवार म्हणाले त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेला 350 ग्रॅम गांजा ताब्यात घेण्यात आला आहे.

इतर बातम्या