Breaking news

पोलिसांना हुलकावणी देऊन तीन वर्ष फरार असलेले आरोपी जेरबंद करण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश

लोणावळा : मागील तीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देऊन फरार असलेले आरोपी यांना जेरबंद करण्यात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्हे शाखेला (डीबी पथकाला) यश आले आहे. 

       लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर 1097/2020  भारतीय हत्यार कायदा कलम 4, (25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1), (3), 135 व मोटार वाहन कायदा कलम 66 (1),192 मधील पाहिजे असेलेले फरारी आरोपी प्रसाद गणेश पवार, गणेश वाघमारे, संदेश जाधव, धनंजय टकले (सर्व रा.   तळेगाव दाभाडे, मावळ) यांचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तळेगाव दाभाडे परिसरात शोध घेऊन सदर गुन्ह्यामध्ये चारही आरोपींना अटक केली आहे.

      सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाळुंजकर, पोलीस हवालदार संतोष शेळके, पोलीस कॉन्स्टेबल केतन तळपे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खैरे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धू शिंदे यांच्या पथकाने केली.

इतर बातम्या