Breaking news

Lonavala Police : लोणावळा एअरफोर्स परिसरात ड्रोन उडविल्या प्रकरणी गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळा एअरफोर्स परिसरात विनापरवाना ड्रोन उडविल्या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कलम 188 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एअरफोर्स चे पोलीस नोहंमद अर्शद आलम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहूल बालकृष्ण बडोले (रा. मुंबई) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.13) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. लोणावळ्यात एअरफोर्स व आयएनएस शिवाजी ही संवेदनशील ठिकाणे असताना देखील या भागात सदर व्यक्तीने जिल्हाधिकारी यांची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता ड्रोन उडविला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ते घातक असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यापुर्वी देखील याभागात प्री वेडिंग शुटिंगसाठी ड्रोन उडविल्याप्रकरणी काही गुन्हे दाखल आहेत. पोलीस नाईक शिंदे हे याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या