Breaking news

Lonavala Crime News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला 10 वर्षाचा सक्त कारावास व 1 लाखाचा दंड

लोणावळा : पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीला वेळो वेळी बंगल्यात एकटीला बोलावून तिचेवर बलात्कार करत, याबाबत वाच्यता केल्यास तीला व तीच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देणार्‍या नराधमावर तीन वर्षापुर्वी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला न्यायलयाने दोषी ठरवत बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 6 अन्वये दोषी ठरवत 10 वर्षे सक्त कारावास व 1 लाख रूपये दंड, दंड न भरलेस 6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

    आप्पा यशवंत साळवे (वय 52 वर्षे रा. कुसगाव बु. लोणावळा ता. मावळ) असे या आरोपीचे नाव आहे. फेब्रुवारी 2018 ते मे 2018 दरम्यान ही घटना घडली होती.

    लोणावळा येथे आई वडील नसलेली एका अल्पवयीन (निर्भया) व अनाथ मुलगी तीच्या चुलत आजी सोबत रहात होती. ती रहात असलेल्या बंगल्याच्या शेजारील एका बंगल्यात काम करणार्‍या साळवे यांनी ओळखीचा फायदा घेत सदर मुलीला बंगल्यात एकटीला बोलावून तिस जिवे मारण्याची धकमी देवून तिचेवर वेळोवेळी बलात्कार केला. अल्पवयीन मुलीस त्यापासून गर्भधारणा झालेबाबत दिनांक 13/5/2018 रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे सदरचे अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आप्पा यशवंत साळवे याच्या विरुद्ध लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं 142/2018 भादवि कलम 376, 506 सह बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 06 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरच्या गुन्हयाचा तपास हा श्रीमती राधिका मुंढे तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक सध्या सहा. पोलीस निरीक्षक नेमणूक एस. बी. झोन ०७ मुंबई शहर व शिवाजी दरेकर पोलीस उपनिरीक्षक यांनी करून आरोपी विरुद्ध गुन्हयाचे दोषारोपपत्र मा. सत्र न्यायालयात दाखल केले होते. दिनांक 13/11/2021 रोजी मे पी.पी. जाधव सत्र न्यायाधिश, शिवाजीनगर, कोर्ट पुणे यांनी आरोपी साळवे यास बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 कलम 6 अन्वये दोषी धरून 10 वर्षे सक्त कारावास व 1 लाख रुपये दंड, दंड न भरलेस 6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

   सदरचे खटल्याचे कोर्ट कामकाज पोलीस निरीक्षक  दिलीप पवार लोणावळा शहर पोलीस स्टेशन याचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी संदेश बावकर सहा पोलीस निरीक्षक व पोलीस हवालदार आल्ताफ हवालदार यांनी सत्र न्यायालयात कामकाज पाहिले आहे. तसचे सदरने खटल्यात सरकारी वकील म्हणून प्रेमकुमार अगरवाल यांनी कामकाज पाहिले अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

इतर बातम्या