Breaking news

Lonavala Cricket Matches : हिंदूहृदयसम्राट चषक 2023 या क्रिकेट सामन्यांना लोणावळ्यात आजपासून सुरुवात

लोणावळा : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्त लोणावळा शहरांमध्ये आजपासून हिंदूहृदयसम्राट चषक 2023 या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते आज रेल्वे ग्राऊंड येथे करण्यात आला.

     मावळ असोसिएशन अधीकृत रजीस्टर संघ तसेच लोणावळा शहर ओपन संघ यांच्या माध्यमातून लोणावळा शहरात दिनांक 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान हे क्रिकेट सामने होणार आहेत. या स्पर्धेचे पुर्ण नियोजन आयोजक शिवसेना समन्वयक जयवंत दळवी, युवासेना चिटणीस शाम सुतार, सल्लागार रामभाऊ थरकुडे व समर्थ स्पोर्ट्स चे मालक सोमनाथ ठोंबरे यांनी केले आहे.

     उद्घाटन प्रसंगी शिवसेना मावळ तालुका संपर्क प्रमुख लोणावळा शहर निरीक्षक प्रभाकर पवार, उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, महिला आघाडी पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख शादान चौधरी, संघटक सुभाष डेनकर, खंडाळा विभाग संघटक आणि युवा उद्योजक परेश भाऊ बडेकर, युवा उद्योजक धनंजय साळुंखे, महिला आघाडी जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, तालुका संघटक अनिल ओव्हाळ, युवासेना चिटणीस पिंपरी चिंचवड अभीजीत गोफन शत्रुघ्न  खंडेलवाल, विवेक भांगरे, धीरज मोहोळ, नरेश काळवीट, पंकज खोले, बाळासाहेब मोहोळ, मंगेश येवले, सचिन गोणते, संजय शिंदे, अमोल शिंदे, कल्पेश ठोंबरे, अक्षय चव्हाण, गोपी चव्हाण, ॠषी थरकुडे, 11 हनुमान क्रिकेट संघाचे खेळाडू सुनील साठे, पंकज देशमुख, सचिन लाल, यश‌ राऊत, विनोद पेशकर, ओमकार सुतार, सुजल सुतार, चिंतन सुतार व पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या