Breaking news

Lonavala Big News : लोणावळा शहर पोलीस ठाण्यात 10 बंगले धारकांवर गुन्हे दाखल

लोणावळा : अनाधिकृतपणे बंगले भाड्याने देणार्‍यांनो सावधान, लोणावळा शहर पोलिसांनी शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसात अनाधिकृतपणे बंगले भाड्याने देणार्‍या तब्बल 10 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लोणावळा शहरात पर्यटकांना बंगले भाड्याने राहण्यासाठी देण्याचा एक नवा ट्रेंड तयार झाला आहे. हे बंगले भाड्याने देताना काहीजण एमटीडीसी च्या कोणत्याही परवानग्या न घेता अनाधिकृतपणे बंगले भाड्याने देत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसात लोणावळ्यात दोन खाजगी बंगल्यांमध्ये दोन जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यानंतर खाजगी बंगल्यांची कायदेशीरता व पर्यटकांची सुरक्षा हा मुद्दा प्रामुख्यांनी ऐरणीवर आल्याने पोलीस प्रशासनाकडून अनाधिकृतपणे बंगले भाड्याने देणार्‍यांवर कारवाई मोहिम हाती घेतली असल्याचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी सांगितले. लोणावळा नगरपरिषदेकडून देखील अनाधिकृत स्विमिंगपूल चा सर्व्हे करण्यात आला असून लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सांगितले.

इतर बातम्या