Breaking news

Lonavala : एसटी बसचा प्रवास पडला 3 लाखाला; अनोळखी महिलेला दाखविलेली दया पडली महागात

लोणावळा : एसटी बसचा प्रवास एका महिलेला चांगलाच महागात पडला आहे. एका अनोळखी महिलेवर दाखविलेली दया ही 3 लाखांचा भुर्दंड देऊन गेली आहे. ही घटना मागील महिन्यात 17 नोव्हेंबरला सायंकाळी घडली होती. 

     उज्वला गौतम भोसले (वय 50 वर्षे, कल्याण पूर्व) ह्या 17 नोव्हेंबर रोजी एसटी मधून प्रवास करत असताना एक अनोळखी महिला लहान बाळाला दूध पाजायचे आहे असे सांगून भोसले यांच्या सिटवर पायाजवळ बसली. बाळाच्या अंगावर कपडा टाकत तीने हातचलाखीने सिटच्या खाली ठेवलेल्या बॅग मधून सोन्याचा ऐवज असलेली पर्स चोरली. त्या पर्समध्ये 1)1,20,000/- रूपये किंमतीचे 3 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 2) 40,000/- रूपये किंमतीचे 1 तोळे वजनाची सोन्याची चैन, 3) 50,000/- रूपये किंमतीचा 12 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 4) 40,000/- रूपये किंमतीचे 1 तोळे वजनाचे सोन्याचे कानातले, 5) 30,000/- रूपये किंमतीचे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी व वाट्या, 6) 4000 /- रुपये किंमतीचे 6 ग्रॅम वजनाचे चांदीच्या पटया व जोडवे असा एकूण 2,84,000/-रूपये किंमतीचा ऐवज होता.

सदर महिला ही लोणावळ्यात वलवण पुलाजवळ एसटी मधून खाली उतरली. भोसले त्याच्या ठिकाणावर पोहवल्यानंतर त्यांना बॅगमधून सोन्याचा ऐवज असलेली बॅग गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे मुंबई येथे दिनांक 17/11/20222 रोजी फिर्याद 00/00 ने दाखल केली. लोणावळा शहर पोलीस स्टेशनला तपासाकरिता ती तक्रार नुकतीच वर्ग करण्यात आली आहे. सदर घटनेचा लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत, याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शकिल शेख पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या