Breaking news

मोठी बातमी l लोहगड किल्ल्याजवळ दरड कोसळली; नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन...

मावळ माझा न्युज नेटवर्क  : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्याजवळील भाजे गावाच्या उत्तर बाजूस शनिवारी (दि. 7 जून) सायंकाळी सुमारे 5.30 वाजता दरड कोसळल्याची घटना घडली. सतत पडणाऱ्या पावसामुळे किल्ल्यालगतचा काही भाग कोसळला असला, तरी सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी वा वित्तहानी झाली नाही.

       लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी लोहगड आणि भाजे ही गावे वसलेली असून, या भागातील लोकसंख्या सुमारे 650 च्या पुढे आहे. दरड कोसळल्याचा आवाज ऐकून नागरिकांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन व महसूल विभागाला सूचना दिली. घटनेनंतर तहसीलदार, पोलीस पाटील, सरपंच व ग्रामसेवक यांनी घटनास्थळी पाहणी करून ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विक्रम देशमुख, तहसीलदार मावळ –

लोहगड किल्ल्याच्या उत्तर बाजूला दरड कोसळल्याची घटना घडली असून मी स्वतः याबाबत माहिती घेतली आहे. कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र नागरिकांनी आगामी पावसाळ्यात अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

इतर बातम्या