Breaking news

लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री नऊ ठिकाणी चोरी - 98 हजारांचा मुद्देमाल पळवला

लोणावळा : लोणावळ्यात रविवारी 10 मार्च रात्री 11 ते सोमवारी 11 मार्च सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान नाकोडा कॉम्प्लेक्स व बाजार परिसरात तब्बल नऊ ठिकाणी चोऱ्या झाल्या. दुकाने, कार्यालय यांचे शटर उचकटून, कुलूप तोडून या चोऱ्या करण्यात आल्या आहेत.

      याप्रकरणी प्रज्वल संदिप निंबोकर (वय 24 वर्षे व्यवसाय-रिकव्हरी एजन्सी रा.टिर्चर काँलणी,शिवाजी चौक,तुंगार्ली,लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे. वरील नऊ ठिकाणी झालेल्या चोरीत चोरट्याने लॅपटॉप, टिव्ही, रोख रक्कम, ब्रेकर इलेक्ट्रॉनिक मशीन, मोबाईल असा 98 हजार 640 रुपयांचा माल चोरला आहे.

     नाकोडा कॉम्प्लेक्स येथील, श्रीसाई इंटरप्राईजेस रिकव्हरी एजन्सी आँफिस गाळा नं.17 व शेजारील व आजु बाजुचे गाळा दुकानदार मालक 1) उमेश रुपनारायण कुमावत, 2) डाँ. प्रशांत प्रकाश पाठक, 3) राज नारायण गवळी, 4) दिनेश नामदेव पवार, 5) समीर हरुन सय्यद, मँनेजर द मुस्लीम काँ-बँक शाखा नाकोडा काँम्पलेक्स,लोणावळा, 6) मनिष दिलीप मनोजा, 7) आँल इंडिया रिटार्यड रेल्वेमेन्स फेडरेशन आँफिस 8) गणेश विठ्ठल निकोडे, 9) अलत्तमश फारुख शेख यांची दुकाने व कार्यालये त्याठिकाणी सदरचा चोरी झाली आहे. 

      अज्ञात चोरटयाने दुकान, गाळा, आँफिस, गोडाऊन, काँ ऑप्रेटिव्ह बँक यांचे लाँक तोडुन शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करत या चोऱ्या करण्यात आल्या आहेत. चोरीचे अनेक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मयूर आबनावे या प्रकरणी तपास करत आहेत.


इतर बातम्या