Breaking news

एक्सप्रेस वेवरून प्रवास करत असेल तर सावधान; मुंबई पुणे एक्सप्रेस वे शेडुंग फाट्याजवळ पाण्याखाली गेला आहे

पनवेल : मुंबई पुणे प्रवासाचा जलदगती मार्ग अशी ओळख असलेला यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेस वे शेडुंग फाट्याजवळ पाण्याखाली गेला आहे. किमी 7 जवळ मुंबई पुणे लेनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने याठिकाणी काही वाहने बंद पडून वाहतूक मंदावली आहे.

    मुंबई शहर व उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. याचा फटका आज मुंबई पुणे एक्सप्रेस वेला देखील बसला आहे. एक्सप्रेस वेवर पाणी साचल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली असून अनेक महागडी वाहने बंद पडून नुकसान झाले आहे. पाण्यामध्ये चार ते पाच वाहने बंद पडली आहेत. रस्त्यावरील पाण्याची परिस्थिती पाहता आयआरबीने रोडवर स्विमिंग पूल तयार केला आहे अशी उपरोधात्मक टिका महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष महेश केदारी यांनी केली आहे. केदारी हे मुंबईहून लोणावळ्यात येत असताना त्यांनी काही वाहने पाण्यात बंद पडल्याचे पाहून आयआरबीच्या नियंत्रण कक्षाला फोन करून ही परिस्थिती सांगितली. त्यावेळी क्रेनच्या सहाय्याने सदर वाहने बाजुला काढूयात असे उत्तर देण्यात आले. मात्र मार्गावर ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी येतपर्यत आयआरबी काय करत होती? का फक्त टोल गोळा करायचा ऐवढाच कारभार सध्या या मार्गावर सुरू आहे का अशा प्रश्न केदारी यांनी उपस्थित केला आहे. 

इतर बातम्या