Breaking news

वलवण गावात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य शोभायात्रा

लोणावळा : श्री चंद्रप्रभु जैन श्वेतांबर मूर्तिपुजक संघ वलवण यांचे वतीने महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमीत्त सकाळी 8 वाजता सामूहिक नवकार मंत्र महाजाप करण्यात आला. त्यानंतर श्री भगवान महावीर स्वामीच्या दिव्य प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढणेत आली होती.

      संघाचे अध्यक्ष आनंद परमार, छगनलाल परमार, राजेंद्र चौहान, दिनेश चौहान, प्रकाश चौहान, मुकेश परमार, जीवन चौहान, राकेश बोराणा, दिपक परमार, रमेश परमार, पोपट परमार, महावीर जैन संघटनेचे अध्यक्ष राकेश परमार, सनी परमार, आभिषेक परमार, रवि परमार, नीकुंज परमार आदीसह अनेक जण या शोभायात्रेत सहभागी झाले होते.

      शोभायात्रे दरम्यान सरबताचे वाटप धवल राजेंद्र चौहान यांचे वतीने व उसाचे रसाचे वाटप देवराजजी सोहनराजजी बोराणा यांचे वतीने करणेत आले. स्वामी वात्सल्य अशोककुमारजी जेठमलजी परमार यांचे वतीने करणेत आले. शोभायात्रेत सर्व जैन बांधव, महिला भगिनी व मुले मुली सहभागी झाले होते.

इतर बातम्या